अफगाणिस्तान मध्ये तालिबान चा उदय.
पश्तून जातीचे सुन्नी - देवबंदी विचारधारे नुसार वागणारे हे लोक आहेत. अफगाणिस्तानची एकूण लोकसंख्या 3 कोटी 80 लाख एवढी असून त्यापैकी 42-45% लोक हे पश्तून आहेत. कट्टर इस्लामी विचारधारे नुसार वर्तनकरणारे हे पश्तून लोक असून यांचा तालिबान वर वर्चस्व आहे.अफगाणिस्तान च्या दक्षिण व पूर्व भागात हे पश्तूनलोक कबीलाई स्वरूपात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. याच कबीलाई पश्तून लोकांना संघटित व एकत्र करून मोहम्मद ओमार आणि अब्दुल घनी बारादार यांनी तालिबान संघटना मजबूत केली.
Pashtuns
1996 मध्ये तालिबानी अतिरेक्यांनी काबूल वर हल्ला करुन राजधानी ताब्यात घेतली व संपूर्ण अफगाणिस्तान वर तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. तालिबानची अफगाणिस्तान मध्ये Islamic Emirates of Afghanistan या नावाने सत्ता स्थापन झाली. शरीया हा मध्ययुगीन इस्लामिक कायदा संपूर्ण देशात लागु झाला आणि जो कोणी याचे पालन करणार नाही त्यांना खूपच क्रूर पणे शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले. अफगाण लोकांवर खूपच अन्याय, अत्याचार सुरू झाले. देशात कट्टरता, अतीवाद वाढला. महिलांच्या शिक्षणावर पूर्ण पणे बंदी झाली. पुरुषांना दाढी ठेवणे बंधनकारक झाले. कोणत्याही कलेला व कलाकारांना काहीच वाव उरला नाही. रोज 5 वेळ नमाज पठण करणे सक्तीचे झाले.
Afghan Women in Hijab
Osama bin Laden
तालीबान ने अल कायदा ला आश्रय दिला, संसाधन पुरवले. आर्थिक मदत पुरवली . पुढे जाऊन याच अल कायदा ने 11 September 2001 ला अमेरिकेच्या New York शहरातील World Trade Center या Twin Building वर हल्ला केला व 2977 लोकांना आपला जीव गमवावा लागला.अमेरिकेच्या इतिहासात, अमेरिकेच्या मुख्य भूमीवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता.
World Trade Center Attack
अमेरिकेने अल कायदा व तालिबान विरोधात युद्ध पुकारले November 2001 ला व अफगाणिस्तान वर हल्ला चढवला. NATO आणि अमेरीकन सैन्य अफगाणिस्तान च्या भूमीवर उतरले. जोरदार युद्ध सुरू झाले. तालिबानी NATO व अमेरिकेच्या अत्याधुनिक सैन्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. तालिबान अतिरेक्यांची पिछेहाट झाली. काबूल, कंधार, हेरात, मजार- ए- शरीफ, कुंदूज ही प्रमुख शहरे अमेरीकन सैन्याने ताब्यात घेतली, काही दिवसातच सर्व प्रांतावर NATO व अमेरीकन सैन्याने आपले नियंत्रण मिळवले व अफगाणिस्तान च्या सत्ते मधून तालिबान ला हुसकावून लावले. संपूर्ण अफगाणिस्तान वर अमेरिकेचे नियंत्रण प्रस्थापित झाले.
Captured Taliban Militant from US Forces
India Built Parliament and Salma Dam in Afghanistan
पन तालिबानला पूर्णपणे संपवणे अमेरिकेला जमले नाही. अतिरेक्यांनी छुप्या मार्गाने अमेरीकन व NATO सैन्यावर हल्ले चालूच ठेवले. बॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ले सुरूच राहिले. यामधे अफगान, अमेरीकन व NATO सैन्याला खूप मोठ्या प्रमाणात आपला जीव गमवावा लागला. 70,000 अफगाणी सैन्य व पोलिस या 20 वर्षाच्या कालावधी मध्ये मृत्युमुखी पडले. अमेरिकेचे जवळपास 2500 सैन्य मृत्युमुखी पडले व हजारोंच्या संख्येने जखमी झाले.
तालिबान आणि अल कायदा चा पराभव केल्यानंतर अमेरीकन जनतेचा अफगाणिस्तान मध्ये अमेरीकन सैन्य ठेवण्यास विरोध वाढू लागला. वाढत्या विरोधामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2011 साली घोषणा केली की 2014 पर्यंत सर्व अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून बाहेर पडेल व मायदेशी परतेल. पन अफगाणिस्तान ची परिस्तिथी बिकट होण्यास सुरुवात झाली. तालिबानी पुन्हा एकदा बळकट होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे अमेरिकेला 2014 पर्यंत अफगाणिस्तान मधून बाहेर पडता आले नाही.
अफगाण सैन्याला योग्य प्रकारे प्रशिक्षित करून त्यांच्या हाती अफगाणिस्तान ची सुरक्षा सोपवून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. यासाठी अमेरिकेने करोडो डॉलर्स अफगाण सैन्याच्या, पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी, शस्त्रास्त्रासाठी खर्च केले.
Afghan National Army Recruits in Training at the Kabul Military Training Center with a US Army Mentor Trainer
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच पूर्ण कार्यकाल हा आपली ताकत वाढवत असलेल्या तालिबान व त्यांना मदत करणार्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI यांच्याशी लढण्यात गेला. डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात अमेरीकन व NATO सैन्य अफगाणिस्तान मधून निघू शकले नाही पन डोनाल्ड ट्रंप यांच्या नंतर सत्तेवर आलेले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी अमेरीकन जनतेला विश्वास दिला की 11 September 2021 पर्यंत सर्व अमेरीकन सैन्य मायदेशी परतेल, तशी घोषणा April 2021 मध्ये करण्यात आली.
US Forces Leaving Afghanistan
अमेरीकन सैन्य निघायला सुरुवात होताच तालिबानी अतिरेक्यांनी अफगाण शहरा वर, जिल्ह्य़ावर, प्रांतावर ताबा मिळवू लागले. अफगाण सैन्याचा प्रतिकार सहजपणे मोडून काढला. अमेरिकेने Air Strike करून अफगाण सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पन तो पुरेसा ठरला नाही. अफगाण सैन्याची पिछेहाट होत गेली. तालिबान्यांनी मोठ्या भूभागावर ताबा मिळवला. अफगाण सैन्याने हत्यार टाकले, काही सैनिक शेजारील देशामध्ये पळून गेले, काही वेषभूषा बदलून राहू लागले. तालिबान्यांनी त्यांची शस्त्रास्त्रे जप्त केली.
Talibani Militants at Kabul
Talibani Militants at Kabul
Talibani Militants at Kabul
15 August 2021 रोजी तालिबानी काबूल मध्ये घुसले, तोपर्यंत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी Oman ला पळून गेले. कोणताही प्रतिकार न होता तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला व राष्ट्रपती भवनावर तालिबानी झेंडा फडकावला. अफगाणिस्तान मध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला बरखास्त करून तालिबानी पुन्हा एकदा आपली सत्ता अफगाणिस्तान मध्ये चालवत आहेत.
Talibani Leaders at Presidential Office
येणारे दिवस हे अफगाण लोकांसाठी खूपच त्रासदायक ठरणार आहेत. तालिबानी सत्तेमुळे देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू झाली आहे. विश्व नेत्यांनी याकडे लक्ष घालून यावर लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. अफगाणिस्तानची अस्थिरता संपूर्ण जगाच्या शांततेसाठी धोकादायक आहे. याचा एक अनुभव जगाने घेतलाच आहे. पुन्हा ती वेळ येऊ द्यायची नसले तर तालिबान वर लवकर आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.
Nitin Shitole - 9689209819